जगण्यासाठी असीम शांततेचा, विश्वासाचा, प्रगाढ श्रद्धेचा एक सूर लागावा लागतो, हे नर्मदामैय्याच्या अंगाखांद्यावरून खेळलो नसतो, तर कळलं नसतं!
थोर तत्त्वचिंतक हेन्री डेव्हिड थोरो वॉल्डनकाठी एकटा राहत असतो, तेव्हा तो निसर्गातल्या तत्त्वाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. परिक्रमा तसंच तर करते. कुठल्याही सामाजिक बंधनाशिवाय, हेव्यादाव्यापासून मुक्त स्वावलंबी जीवन शिकवते. कमीत कमी साधनांत व श्रमात सुंदर जगत उरलेल्या वेळेत भरपूर चिंतन-मनन, वाचन करत मनाच्या व मानवी समूहाच्या कल्याणाकडं कसं पाहता येईल, याचा मार्ग देते.......